महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्ष नेते श्री विजय वडेट्टीवारांनी आज नामांकन दाखील केले. नामाकन दाखील करायला ब्रम्हपुरी स्थित आपल्या राहते घरून निघाले. त्या वेळी त्यांच्या सोबत रॅलीमध्ये त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ब्रम्हपुरीवासी तसेच हजारो जनता सामील होते.
सोबतच छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री श्री भुपेष बघेल हे नामाकंन अर्ज दाखील करतांना श्री वडेट्टीवारांन सोबत उपस्थित होते. घरून निघतांना त्यांचा पत्नीने औक्षवंत केले व तसेच रॅलीमध्ये श्री वडेट्टीवार यांची मुलगी त्याचां बरोबरीने उपस्थित होती.
तसेच श्री विजय नामदेवराव वडेट्टीवार हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे इतर मागासवर्ग, सामाजीक व शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप व पुनर्वसन या विभागाचे कॅबिनेट मंत्री होते. त्यांची राजकीय जीवनाची सुरूवात शिवसेनेत झाली होती.