भाजपा नेते श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आई महालक्ष्मीचे दर्शन. केली उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा. म्हणाले दिवसेंदिवस लक्ष कामठीवासीयांचा भर माझ्यावर आहे.
भाजपा नेते श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आई महालक्ष्मीचे दर्शन करून भारतीय जनता पक्ष उमेदवार म्हणून नागपूर जिल्ह्याच्या कामठी विधानसभेतून उमेदवारी अर्ज सादर करणार. जनतेवर विश्वास दाखवत ते म्हणाले की कामठी विधानसभेत माझे प्रत्येक परिवाराशी हृदयाचे संबंध आहेत आणि हीच जनता महाराष्ट्राच्या विकासासाठी मला मत देणार आणि मला विजयी करणार.
चंद्रशेखर बावनकुळे हे १३व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. तसेच २६ डिसेंबर २०१४ रोजी नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी कामठी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्वही केले होते. राजकारणात उतरल्यापासून त्यांनी सतत कामठीच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले आहेत आणि पुढे हे प्रयत्न करत राहणार असे त्यांनी जनतेला आश्वासन दिले आहे.