महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी ने एक ट्विट केले आहे ज्यामध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विधानावर टीका करण्यात आली आहे. भाजपने सोशल मीडियाचा उपयोग करून एक व्हिडीओ जनतेसमोर आणला आहे ज्यात खुद्द वडेट्टीवार मतदारांना शिव्या देताना व धमकावत दिसत आहेत. नेमकं काय असेल त्या ट्विटमध्ये?
राज्यात विधान सभा निवडणूक खूप रंगात आलेली आहे. निवडणुकीचे काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी ठिकठिकाणी नेत्यांच्या जाहीर सभा होत आहेत. तसेच सभांमध्ये नेत्यांद्वारे दिलेली भाषणे, केलेली टीका, आणि केलेली विधाने सर्वत्र पसरत आहेत. अशा गर्मागर्मीच्या वेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या भाषणावर भारतीय जनता पार्टी ने टीका केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी भाषण देताना चुकीचा आपत्तिजनक शब्दांचा वापर करून शिविगाळ केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. विजय वडेट्टीवार यांच्या भाषणाचा व्हिडीओ ट्विट केला आहे ज्यामुळे संपूर्ण काँग्रेस पार्टीला घेरण्यात आले आहे. आता जनता काँग्रेसला धडा शिकवेल असं भाजपकडून सांगण्यात आलं आहे.
निवडणुकीच्या बाबतीत मतदाराशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी शिविगाळ केली. विजय वडेट्टीवार यांचा वादग्रस्त व्हिडीओ भाजपने ट्विट केलेला आहे.
काँग्रेस का हाथ, मतदारांचा घात… काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार मतदारांना हरामखोर म्हणत आहेत. 20 तारखेनंतर तुम्हाला पाहून घेईन, तुमची नावं लिहून ठेवली आहेत, अशी धमकी त्यांनी मतदारांना दिली आहे.
मतदार हा लोकशाहीत राजा असतो पण लोकशाही, संविधान, स्वातंत्र्य, जनतेचा विकास या सर्वांचा काँग्रेसला सुरुवातीपासूनच तिरस्कार आहे. ज्यांनी संविधानाची पायमल्ली करत देशावर आणि बळीत लाडली असंख्य सामान्य लोकांना तुरुंगात डांबून ठेवले ती काँग्रेस पुन्हा मतदारांना धमकवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राची जनता मतदानातून काँग्रेसची मस्ती नक्कीच उतरवणार.