जन-आशिर्वाद यात्रेत विकास ठाकरेंचे प्रतिपादन
नागपुर : लोकशाहीत एका मताचा अर्थ सर्व जनतेला माहीत आहे. तुम्ही एका मताने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी मोठा नेता बनतो. यानंतर हा नेता जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी वारंवार निवडणुका लढवत राहतो. या लोकशाहीत एक मत देऊन जो नेता मोठा नाही तर त्याला मोठा करणारा मतदार राजा मोठा असतो. असे प्रतिपादन प्रसिद्धी पत्रका द्वारे पश्चिम नागपुरचे विद्यमान आमदार, नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी व्यक्त केला. जन-आशीर्वाद यात्रेत बुधवारी वंदे मातरम गार्डन परिसरात एका छोटेखानी सभेत विकास ठाकरे म्हणाले की, प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आणि प्रत्येक मोठ्या नेत्याने लक्षात ठेवायला हवी. परंतु, सामान्य माणसाला नेता बनवणाऱ्या भोळ्या जनतेला तोच नेता मत देण्याची भाषा करतो. तसेच तो फक्त मी केलेल्या डेव्हलपमेंटचे दाखले देण्याचे भाषणे देत बसतो. त्या नेत्याची भाषा ही बदलले आपल्या दिसते. यात तो जनतेला म्हणतो की, आता मी तुमच्याकडे मत मागायला येणार नाही. तसेच कुणालाही चाय पाजणार नाही. तुम्हाला मत द्यायचे असेल तर द्या मी तर पाच लाखांच्या लिड मतांनी येणार. अश्या शेक्या मारणाऱ्या नेत्याला जनता गल्ली बोळात फिरवते हे आपण 3 महिन्यापूर्वी आपल्या लक्षात आहे. गत लोकसभेत जे पश्चिम नागपुरच्या जनतेने मला जो आशिर्वाद दिला. त्याचप्रमाणे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपण मला असाच आशिर्वाद द्याल हिच आपणास नम्र विनंती. मी प्रत्येक मतदारांचे एक वोट मागण्यापूर्वी मी आपणास सांगतो की, मी हे नाही म्हणार की शंभर टक्के विकास कामे पश्चिम नागपुरात केले आहे. परंतु, मी पन्नास टक्के विकास कामे मी आपल्या क्षेत्रात केले आहे. उर्वरित 50 टक्क्यांची कामे पूर्णत्वास आणण्याकरिता आपण पुढील पाच वर्षात करण्याची आपणास हमी देतो. आपण दिलेल्या एक मतातून मला गेल्या निवडणुकीत आमदार बनता आले. आपल्या विश्वासानेच मला पश्चिम नागपुरात विकास कामे करता आले. गेल्या पाच वर्षात आपल्या प्रभागात काय केले ते आपणास माझ्या वचननाम्यात मी नमूद केले आहे. आता पुढील पाच वर्षाकरिता पुन्हा आपला आशिर्वाद माझ्यावर असू द्या असेही विकास ठाकरे यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडीचे पश्चिम नागपुरचे लोकप्रिय उमेदवार विकास ठाकरेंच्या जन-आशीर्वाद यात्रेची सुरुवात बुधवारी रामनगर चौकातून करण्यात आलकी. सकाळी आठ वाजता मुख्य चौकात महाविकास आघाडीचे सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येत प्रचारार्थ उपस्थित होते. यावेळी विकास ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत करून जन-आशीर्वाद यात्रेला प्रारंभ झाला. यानंतर फुले नगर, पोलिस चौकी, संजय नगर, संत रविदास मंदीर, ट्रस्ट लेआऊट, चोपडे गल्ली, जयनगर शिवमंदीर, नागवंशी बुद्ध विहार, मुंजे बाबा लेआऊट, सुदामनगरी, अंबाझरी, हिल टॉप, अजय नगर, गोंड मोहल्ला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, अंबाझरी बुद्ध विहार मार्गाने जी. बी. हॉस्पिटल येथे यात्रेचे समापन करण्यात आले. तर सायंकाळी पाचच्या दरम्यान जन-आशीर्वाद यात्रेच्या दुसरा टप्पा कुंभारपुरा येथील बुद्ध विहारातून सुरुवात करण्यात आली. यावेळी विकास ठाकरे यांनी विहारात जाऊन तथागत बुद्ध आणि परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करून त्यांना अभिवादन केले. नागरिकांनी स्वंयफूर्तीने यात्रेचे जागोजागी जल्लोषात स्वागत करुन विकास ठाकरेंना विजयाचा आशिर्वाद दिला. जन-आशीर्वाद यात्रेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसादातून ठाकरेंचा दुसऱ्यांदा विधानसभेत पाठविण्याचा संकल्प केल्याचे बुधवारी दिसून आले. जन आशिर्वाद यात्रेत विकास ठाकरे यांनी जाहिर केलेल्या वचननामाचे वाटप नागरिकांना करण्यात आले. भव्य असलेली रैली पुढे कृष्णा टॉकीज, भोईपूरा 6 नल, सम्राट गेस्ट हाऊस, बजरिया चौक, कुंभारपूरा रोड, मारवाडी चाळ, वंदे मातरम गार्डन, मराठी तेलीपुरा, नन्नूमल बिल्डिंग, गणेश पंचकमेटी, शिवहरे मेडिकल्स, बैद्यनाथ चौक, बाजपेयी मंदिर मार्गाने यात्रेचा बजेरिया येथे समारोप करण्यात आले. जन-आशीर्वाद यात्रेत महाविकास आघाडीमधील सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
डुप्लिकेट सलमान, शाहरुख व नाना पाटेकर ने केला काँग्रेसचा प्रचार
बुधवारी अभिनेता सलमान खान, नाना पाटेकर व शाहरुख खान यांच्या सारखे हुबेहूब दिसणाऱ्या डुप्लिकेटस यांनी महाविकास आघाडीचे पश्चिम नागपुरचे लोकप्रिय उमेदवार विकास ठाकरेंच्या प्रचारार्थ रोड शो केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी आमदार माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात निघालेल्या रोड शोमध्ये भव्य रथावर तिन्ही कलावंतानी विकास ठाकरे यांना मत देण्याचे आवाहन पश्चिम नागपुरच्या जनतेला केले. प्रचारासाठी सिने कलावंत आल्याने मतदारांनी त्यांचा लूक पाहण्यासाठी एकच गर्दी केली. यात काही लोकांमध्ये सेल्फी काढण्याची स्पर्धा लागल्याचे दिसून आले. यावेळी प्रकाश गजभिये म्हणाले की, पश्चिमच्या सर्वांगिण विकासाचे कायापालट करणारे विकास ठाकरेंच्या पाठिशी मतदार खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे त्यांचा दुसऱ्यांदा विजय निश्चित होणार असेही गजभिये म्हणाले. यावेळी महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
माजी आमदार कपिल पाटीलांनी दिले ‘MVA’ला समर्थन
कंत्राटीकरण, नवीन पेन्शन यातून होणारे शोषण आणि नाकारलेले हक्क या विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकवर्ग लढा देत आहे. शिक्षकांसह कर्मचारी वर्गाच्या प्रलंबित मागण्यांना पूर्ण करण्याचे आश्वासन महाविकास आघाडीने दिले. त्यामुळे महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीला शिक्षक भारतीचे संस्थापक, हिंद मजदूर किसान पंचायतचे अध्यक्ष व माजी विधान परिषद आमदार कपिल पाटील यांनी महाविकास आघाडीला जाहीर समर्थन दिले आहे. काँग्रेस पक्ष, काँग्रेस पुरस्कृत आणि महाविकास आघाडीला राज्यातील कामगार, कर्मचारी आणि शिक्षकांनी मदतान करण्याचे आवाहन कपिल पाटील यांनी समर्थन पत्रातून केले आहे.