पश्चिम नागपुरात काँग्रेसच्या ‘हाता’ला मतदारांचा कौल 24 तास उपलब्ध राहणाऱ्या विकास ठाकरेंना जनतेची पसंती
पाणी, ड्रेनेज व्यवस्थेयह शहराच्या स्वच्छतेवर फोकस
शहरातील प्रत्येक नागरिकाच्या सुखदुखात सदासर्वकाळ धाऊन येणारा. सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून कार्य करणारा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पश्चिम नागपुरातून नगरसेवक, महापौर आणि आता विद्यामान आमदरकी भूषविणारे विकास ठाकरे यांची ओळख बनली आहे. कधी भेटीची वेळ न घेता भेट देणारा लोकसेवक म्हणून शहरासह आपल्या मतदारासंघात सेवेसाठी 24 तास तत्पर राहणाऱ्या विकास ठाकरेंना जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. असेच काही शुक्रवारी महाविकास आघाडीचे तसेच काँग्रेसचे पश्चिम नागपुरचे उमेदवार विकास ठाकरेंच्या जन-आशिर्वाद यात्रेत नागरिकांच्या स्वंयफूर्तीने जागोजागी केलेल्या स्वागतातून दिसून आले. त्यामुळे पश्चिम नागपुरात मतदारांचा कौल काँग्रेसच्या ‘हाता’ला मिळत असल्याची माहिती प्रसिद्धी पत्राकातून विकास ठाकरे यांनी दिली.
गेल्या 5 वर्षात पश्चिम नागपुरात आमदार झाल्यानंतर ठाकरेंनी जनतेची निःस्वार्थीपणे सेवा केली. शहरातील गुन्हेगारीसह महिला सुरक्षेचा मुद्दा सातत्याने विधानसभेत त्यांनी सातत्याने मांडले. तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून सदैव प्रयत्न त्यांचा राहिला आहे. पश्चिम मतदारसंघाची आमदार म्हणून त्यांची वेगळी ओळख झाल्याने ते एटीएमप्रमाणे 24 तास लोकांना सेवा देणारे लोकप्रतिनिधी असल्याचे मत यावेळी जनता व्यक्त करीत असल्याचे आजच्या प्रचार रैलीतून दिसून आले. ‘आमचे मत विकासाला, महाविकास आघाडीच्या विकास ठाकरेंना’, ‘विकासजी ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘महाविकास आघाडीचा विजय असो’, अशा घोषणा देत उपस्थित जनसमुदायाने आमदार ठाकरे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
गोरेवाडा चौकात झालेल्या छोटेखानी सभेत ठाकरे यांनी सांगितले की, रस्ते, पाणी, ड्रेनेज, अस्वच्छतेचा प्रश्न शहरात सतावत आहे. शहरासह पश्चिम नागपुरातील रस्त्यांचे निराकारण करण्यासाठी आपण नेहमीच विधानसभेच्या दालनातून पाठपुरावा केला. गेल्या पाच वर्षात उर्वरित राहिलेले अनेक ठिकाणचे रस्ते पावसाळ्यात चिखलमय होतात. त्यापार्श्वभूमीवर ड्रेनेज योजनेचे काम प्रभावी व मुदतीत करण्याचे आव्हान असणार आहे. याशिवाय पश्चिम नागपुरातील सर्व प्रभागात क्षेत्र ‘नो वॉटर लॉगिंग एरिया’ म्हणून विकसित केला जाईल. पाणी साचणारी ठिकाणे ओळखून त्या समस्यांचे निराकरण केले जाईल. नवीन नाल्या बांधणे, जुन्या नाल्या सुधारित करणे आणि आवश्यक असलेली कामे केली जातील. आपल्या मतदार संघात शासन निधी उपलब्ध करून त्यास पूर्णत्वास करण्याचा आपला निर्धार राहणार असल्याचेही विकास ठाकरे यांनी बोलून दाखविले. आमदार म्हणून मतदारसंघाच्या विकासासाठी अतिशय समर्पितपणे काम करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधांचा विकास केला, ज्यामुळे मतदारसंघातील नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. माझ्या कार्यकाळात अनेक नवीन रस्ते बांधले गेले असून, सौंदर्यीकरण आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यासह अनेक कामे केल्याचेही विकास ठाकरे यांनी सांगितले.
पश्चिम नागपुरच्या जनतेने गाजवली जन-आशीर्वाद यात्रा
महाविकास आघाडीचे पश्चिम नागपुरचे लोकप्रिय उमेदवार विकास ठाकरेंच्या जन-आशीर्वाद यात्रेची शुक्रवारी सुरुवात जे. के. हाऊस रिंग रोड चौकातून करण्यात आली. सकाळी आठ वाजता परिसरातील प्रमुख देवस्थाळांचे पूजन करून प्रारंभ झाले. जन-आशीर्वाद यात्रा पुढे श्रीराम चौक, उत्थान नगर बुद्ध विहार, सवाना लॉन, गोरेवाडा छठ पूजा घाट, गोरेवाडा वस्ती, माधव नगर, नित्तल स्कूल, इरोज सोसायटी, नटराज नगर, शिव मंदीर, प्रेम सेवा बुद्ध विहार गोरेवाडा मार्गाने गोरेवाड्यातील शितला माता मंदिरात यात्रेचा समारोप झाले. यात्रेत महाविकास आघाडीचे सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येत प्रचारार्थ उपस्थित होते. नागरिकांनी स्वंयफूर्तीने यात्रेचे जागोजागी जल्लोषात स्वागत करुन विकास ठाकरेंना विजयाचा आशिर्वाद दिला. तर सायंकाळी पाचच्या दरम्यान जन-आशीर्वाद यात्रेच्या दुसरा टप्प्याची सुरुवात ओवैस कादरींच्या कार्यालयापासून करण्यात आली. जन आशिर्वाद यात्रेत विकास ठाकरे यांनी जाहिर केलेल्या वचननामाचे वाटप नागरिकांना करण्यात आले. भव्य असलेली प्रचार रैली पुढे , मंशा चौक, अवस्थी चौक, गौसुल आजम चौक, मरकज ईदगाह ग्राऊंड, काळबांडे नर्सिंग होम, ओवैस कादरी यांचे निवासस्थान, प्राईम नर्सिंग चौक, अनंत नगर चौक, सुशील मेडिकल, वकिल किराणा, नशेमन हॉल, नूरी मस्जिद, शिव मंदीर, अमन प्राईड, न्यू अनबाब मस्जिद मार्गाने बोरगाव चौक पोस्ट आफिस येथे यात्रेचे समापन झाले. जनतेकडून मिळालेल्या जनसमर्थनातून त्यांनी ठाकरे यांना प्रचंड मताधिक्याने विधानसभेत पाठविण्याचा संकल्प केल्याचे दिसून आले.