मतदारांना विकास ठाकरेंनी दिला विश्वास – झंझावत प्रचारात ठिकठिकाणी पुष्पवृष्टी
कॉंग्रेससह महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह
नागपुर: महिलांच्या सन्मानासाठी, युवकांच्या रोजगारासाठी, बळीराजाच्या उत्थानासह इतर समाज घटकासाठी विविध जनकल्याण योजना प्रभावीपणे महाविकास आघाडी सरकार राबविणार आहे. त्यामुळे आगामी काळात आपल्या मतदार संघांतील सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याकरिता तुम्ही मला पुन्हा 5 वर्षे तुमचा आमदार म्हणून संधी द्या. कॉंग्रेसच्या ‘हात’ चिन्हाला दिलेले मत पश्चिम नागपुरच्या विकासाला बळ देणार, असा विश्वास पश्चिम नागपुर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी मतदरांना दिला.
जन-आशीर्वाद यात्रेत झिंगाबाई टाकळी परिसरात सोमवारी एका छोटेखानी सभेत विकास ठाकरे म्हणाले की, पश्चिम नागपुरात गेल्या पाच वर्षात मी केलेली कामांच्या जोरावर आज मी आपल्याकडे पुन्हा आशिर्वाद मागायला आलो आहे. पश्चिमच्या प्रगतीसाठी तुमच्या हक्काचा माणूस विधानसभेत पाठवून मतदारसंघाच्या विकासाला चालना द्या, असेही विकास ठाकरे म्हणाले.
गेल्या 40 वर्षापासून राजकीय, सामाजिक जीवनात वावरत असताना मी हे सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन ‘जनता माझी मी जनतेचा’ या ब्रीदवाक्या प्रमाणे मी काम करीत आहे. शहरासह आपल्या मतदारासंघात सेवेसाठी 24 तास तत्पर राहून जनतेची सेवा करण्याचा माझा मानस आहे. आपल्या आशिर्वादाच्या बळावर आज विकास कामांना गती मिळाली आहे. आता पुन्हा मतदान रुपी आशिर्वाद देऊन काँग्रेसच्या हात निवडणूक चिन्हाला विजयी करा. महाविकास आघाडी सरकार आल्यास लोकसेवेची पंचसुत्री योजनांसह पश्चिम नागपुरसाठी जनतेचा स्वप्नपूर्तीचा वचनामा हा आपल्या क्षेत्राची भौगोलिक परिस्थिती बदलविणार. त्यामुळे पश्चिम नागपुराचा चौफेर विकास होणार आहे. यात महिलांना स्वरोजगार, आधुनिक रुग्णालय, रस्त्यांचे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरन, सुसज्ज वाचनालय, सिसी फ्लोरिंग, आयब्लॉक्सची कामे, सिवर लाइनचे बांधकामे, पाण्याची समस्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याशिवाय क्रीडा, सांस्कृतिक, रोजगार, शिक्षण, उद्योग या सर्व प्रश्न सोडविण्याचा आपला संकल्प असल्याची माहिती पश्चिम नागपुरचे विद्यमान आमदार, नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिली.
दुतर्फा फुलांची उधळण करून जन-आशीर्वाद यात्रेचे स्वागत
महाविकास आघाडीचे पश्चिम नागपुरचे लोकप्रिय उमेदवार विकास ठाकरेंच्या जन-आशीर्वाद यात्रेची सुरुवात सोमवारी सकाळी झिंगाबाई टाकळी येथील पुरुषोत्तम सुपर बाजार परिसरातून करण्यात आली. सकाळी आठ वाजता परिसरातील देवस्थळांचे दर्शन व पूजन करून जन-आशीर्वाद यात्रेला प्रारंभ करण्यात आले. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने महाविकास आघाडीचे सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येत प्रचारार्थ उपस्थित होते. यानंतर जन-आशिर्वाद यात्रा पुढे झिंगाबाई टाकळी गाव, गोधनी, गोधनी नाका, अंजना देवी मंगल कार्यालय, गायत्री नगर, बाबा फरीद नगर, बंधू नगर, गीता नगर, झेंडा चौक, झिंगाबाई टाकळी मार्गे पांडुरंग मंगल कार्यालय येथे यात्रेचा समरोप झाले. यावेळी पश्चिम क्षेत्रातील महिला, पुरुष, तरुण विकास ठाकरे यांच्या स्वागतासाठी जागोजागी रस्त्यावर दिसून आले. रस्त्याच्या दुतर्फा फुलांची उधळण करीत नागरिकांनी जन-आशिर्वाद यात्रेच्या प्रचार रॅलीचे स्वागत केले. मुख्य चौकात फटाक्यांची आतषबाजी करीत विकास ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. या रॅलीचे पश्चिम नागपुरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने ठाकरे यांना प्रचंड मताधिक्याने दुसऱ्यांदा विजयी करणार असल्याचे दिसून आले. जन आशिर्वाद यात्रेत विकास ठाकरे यांनी जाहिर केलेल्या वचननामाचे वाटप नागरिकांना करण्यात आले. प्रचाराला महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी जनतेला कॉंग्रेसच्या हात ह्या चिन्हाचे बटन दाबून विकास ठाकरे यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन केले.