श्री. प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी त्यांना वाहिली आदरांजली
भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज (11 डिसेंबर 2024) राष्ट्रपती भवनातील अशोक मंडप इथल्या त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे, लहान मुलांचे शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेत तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम आणि संसाधनांच्या उपयोगाने व्हायला हवे या संकल्पनेला पाठबळ देते – पंतप्रधान
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे, लहान मुलांचे शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेत तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम आणि संसाधनांच्या उपयोगाने व्हायला हवे या संकल्पनेला पाठबळ देणारे धोरण आहे ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशावर प्रतिसाद देतांना ही बाब अधोरेखित केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक्स या समाज माध्यमावरील प्रतिसाद :
” केंद्रीय शिक्षणमंत्री @dpradhanbjp यांनी लहान मुलांमध्ये संपूर्ण आकलनासह शिकण्यासाठी, त्यांची सर्जनशीलता जोपासण्यासाठी आणि त्यांच्या सांस्कृतिक मुळांचे जतन करण्यासाठी त्यांना मातृभाषेतून शिकविण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या संकल्पनेला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नाविन्यपूर्ण उपक्रम आणि संसाधनांच्या उपयोगाची जोड देत कशा रितीने पाठबळ दिले जात आहे ही बाबही त्यांनी अधोरेखित केली आहे. – अवश्य वाचा”.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे केले स्मरण.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले.
मुखर्जी हे एक उत्कृष्ट राजकारणी होते, तसेच उत्तम प्रशासक होते देशाच्या विकासातील त्यांच्या योगदानाची पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटले आहे :
“श्री प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली. प्रणव बाबू एकमेवेद्वितीय सार्वजनिक व्यक्तिमत्त्व होते तसेच ते एक उत्कृष्ट राजकारणी, एक अद्भुत प्रशासक आणि ज्ञानाचे भांडार होते. भारताच्या विकासातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांना एखाद्या मुद्यावर संपूर्ण लोकांमध्ये एकमत निर्माण करण्याच्या अनोख्या क्षमतेचे वरदान लाभले होते. हे वरदान त्याना त्यांच्या विपुल अनुभवातून, शासन आणि भारताच्या संस्कृतीबद्दलची सखोल ज्ञान यामुळे लाभले होते. आपल्या राष्ट्राबाबतची त्यांची दृष्टी प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आम्ही काम करत राहू.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुब्रमण्यम भारती यांना वाहिली आदरांजली
सुब्रमण्यम भारती यांच्या कार्याच्या संग्रहाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी होणार प्रकाशन
कवी आणि लेखक सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली.
सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त आज दुपारी १ वाजता ७, लोककल्याण मार्गावर आयोजित एका कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा संग्रह प्रकाशित करण्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
‘महान व्यक्तिमत्व सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. ते द्रष्टे कवी, लेखक, विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक होते. त्यांच्या शब्दांनी असंख्य लोकांमध्ये देशभक्ती आणि क्रांतीची ज्योत पेटवली. समता आणि महिला सक्षमीकरणाबाबतचे त्यांचे पुरोगामी वैचारिक आदर्शही तितकेच प्रेरणादायी आहेत.
आज दुपारी १ वाजता ७, लोककल्याण मार्गावरील एका कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा संग्रह प्रकाशित करणार आहे. हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल मी श्री सीनी विश्वनाथन जी यांचे अभिनंदन करतो.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गीता जयंतीनिमित्त देशवासीयांना दिल्या शुभेच्छा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गीता जयंतीनिमित्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या पवित्र ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित करणारी एक लघू चित्रफीतही सामायिक केली आहे. पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटले आहे :
“ समस्त देशवासीयांना गीता जयंतीनिमित्त अनंत शुभेच्छा. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरांचा मार्गदर्शक असणाऱ्या या दिव्य ग्रंथाच्या उद्गम दिनाच्या रुपात साजरा केला जाणारा हा पावन उत्सव प्रत्येकाला कर्मयोगाचा पथ दाखवणारा ठरो. जय श्री कृष्ण!”
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 चे उद्घाटन
विकसित भारताचे सारथ्य विद्यार्थ्यांच्या हातात असून त्यांचे नवोपक्रम आणि सळसळता उत्साह जगासमोरील समस्यांवर उपाय शोधू शकेल – धर्मेंद्र प्रधान
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या अंतिम फेरीचे उद्घाटन केले. उद्घाटन सोहळ्याला ईशान्य विभागाचे केंद्रीय शिक्षण आणि विकास राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार उपस्थित होते. शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार; राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच, एन ई टी एफ चे अध्यक्ष प्रा.अनिल सहस्रबुद्धे; एआयसीटीईचे उपाध्यक्ष डॉ.अभय जेरे आणि इतर अधिकारीही कार्यक्रमाला उपस्थित होते. देशभरातील विविध केंद्रांमधून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) चे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम, शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी आणि मार्गदर्शक य़ा कार्यक्रमात सहभागी झाले होते. देशभरातील 51 केंद्रांवर एकाच वेळी हॅकेथॉन होत आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेली स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा नवोन्मेष आणि सर्जनशीलतेचे केंद्र बनले असून याठिकाणी देशभरातील विद्यार्थी समकालीन आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी आपल्या विचारशक्तीला चालना देतात, विकसित भारताचे सारथ्य विद्यार्थ्यांच्या हातात असून त्यांचे नवोपक्रम आणि सळसळता उत्साह जगासमोरील समस्यांवर उपाय शोधू शकेल, असे ते म्हणाले. देशातील तरुणांची प्रतिभा, दूरदृष्टी, कठोर परिश्रम, नेतृत्व आणि नवकल्पना यामुळे भारताला 21व्या शतकातील ज्ञान अर्थव्यवस्था, उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी विकास प्रारूप तसेच विकासाचे इंजिन म्हणून उदयास येण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही त्यांनी अधोरेखित केले.
युवकांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हा सरकारची मंत्रालये आणि विभाग, उद्योग आणि इतर संस्थांच्या महत्त्वाच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा देशव्यापी उपक्रम आहे. 2017 मध्ये सुरू झालेले स्मार्ट इंडिया हॅकेथॉन युवा नवोन्मेषकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मागील सहा आवृत्त्यांमध्ये, विविध क्षेत्रांमध्ये अनेक अभिनव संशोधनपर उपाय पुढे आले आहेत आणि प्रस्थापित स्टार्टअप्स म्हणून मान्यता पावले आहेत.
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (SIH) ची 7 वी आवृत्ती आज (11 डिसेंबर 2024) देशभरातील 51 केंद्रांवर एकाच वेळी सुरू झाली आहे. सॉफ्टवेअर संस्करण अखंड 36 तास चालेल आणि हार्डवेअर संस्करण 11 ते 15 डिसेंबर 2024 पर्यंत सुरू राहील. मागील आवृत्त्यांप्रमाणे, यावेळी देखील विद्यार्थी संघ मंत्रालय, विभाग किंवा उद्योगांनी दिलेल्या समस्या विधानांवर काम करतील किंवा राष्ट्रीय महत्त्व आणि राष्ट्रीय प्राधान्यांच्या क्षेत्रांशी संबंधित 17 संकल्पनांपैकी कोणत्याही एका संकल्पनेवर विद्यार्थी नवोपक्रम श्रेणीत आपली कल्पना येथे सादर करतील. या संकल्पना पुढीलप्रमाणे आहेत – आरोग्यसेवा, पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक, स्मार्ट तंत्रज्ञान, वारसा आणि संस्कृती, शाश्वतता, शिक्षण आणि कौशल्य विकास, पाणी, कृषी आणि अन्न, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन.
या वर्षीच्या आवृत्तीच्या काही चित्तवेधक समस्या विधानांमध्ये इस्रोने सादर केलेल्या ‘चंद्रावरील गडद प्रदेशांच्या संदर्भात ज्ञान वर्धन’, जलशक्ती मंत्रालय आणि मंत्रालयाने सादर केलेले ‘कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह डेटा, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि डायनॅमिक मॉडेल्स वापरून रिअल-टाइम गंगा जल गुणवत्ता देखरेख प्रणाली विकसित करणे’ आणि आयुष मंत्रालयाने सादर केलेले ‘कृत्रिम बुद्धिमत्ता युक्त स्मार्ट योग मॅट विकसित करणे’ यांचा समावेश आहे.
यावर्षी, 54 मंत्रालये, विभाग, राज्य सरकारे, सार्वजनिक उपक्रम आणि उद्योगांनी 250 हून अधिक समस्या विधाने सादर केली आहेत. संस्था स्तरावरील अंतर्गत हॅकेथॉनमध्ये प्रभावी 150% ची वाढ नोंदवली गेली आहे, जी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (SIH) 2023 मधील 900 वरून वाढून स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (SIH) 2024 मध्ये 2247 पर्यंत वाढली आहे. यामुळे ही आतापर्यंतची सर्वात मोठी आवृत्ती ठरली आहे. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (SIH) 2024 मध्ये संस्था स्तरावर 86000 हून अधिक संघ सहभागी झाले आहेत आणि राष्ट्रीय स्तरावरील फेरीसाठी या संस्थांनी सुमारे 49,000 विद्यार्थी संघांची (प्रत्येक संघात 6 विद्यार्थी आणि 2 मार्गदर्शकांचा समावेश आहे) शिफारस केली आहे.
संसदेतील प्रश्न: दृष्टिहीन मुला-मुलींचे शिक्षण
दिव्यांगांना मदत हा भारतीय राज्यघटनेच्या राज्य सूचीतील 9 क्रमांकाच्या नोंदीनुसार राज्याचा विषय आहे. सरकारने दिव्यांगजन हक्क कायदा, 2016 लागू केला ज्याची अंमलबजावणी 19.04.2017 पासून सुरु झाली . सदर कायद्याच्या कलम 16 आणि 17 अंतर्गत सर्वसमावेशक शिक्षण आणि कलम 31 अंतर्गत मानक (40% किंवा अधिक) दिव्यांग मुलांना मोफत शिक्षण प्रदान करते. मात्र केंद्र सरकार दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी राज्य सरकारांच्या प्रयत्नांमध्ये मदत करते.
या विभागांतर्गत डेहराडून येथील एनआयईपीवीडी ही दृष्टिबाधितांच्या सशक्तीकरणासाठी काम करणारी राष्ट्रीय संस्था डेहराडून, उत्तराखंड येथे सीबीएसईशी संलग्न दृष्टिबाधित मुलांसाठी (दिव्यांगजन) वरिष्ठ माध्यमिक मॉडेल स्कूल चालवत आहे आणि 248 मुलांना नर्सरी ते इयत्ता 12वी पर्यंत शिक्षण देत आहे.
एनआयईपीवीडी ने दृष्टीदोष असलेल्या मुलांना उपलब्ध करून दिलेली सुलभ शिक्षण सामग्री पुढीलप्रमाणे आहे:
1. ई-पब/डेझी
2. मानवी आवाजात रेकॉर्डिंग
3. मोठ्या प्रिंट/ऑडिओ बुक्स
4. ओसीआर- प्रूफरीडिंगशिवाय ई-पबची रचना
5. स्पर्शाने ओळखता येतील अशा आकृती
6. सुगम्य पुस्तकालयाच्या माध्यमातून ऑनलाइन सेवा
याव्यतिरिक्त, विभाग दृष्टिहीन बालकांच्या शिक्षणासह दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी खालील प्रमुख योजना राबवत आहे:
विभागाच्या दीनदयाल दिव्यांगजन पुनर्वसन (डीडीआरएस) योजनेंतर्गत दिव्यांगजनांच्या कल्याण/सक्षमीकरणासाठी विविध प्रकल्प राबविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते, ज्यात दृष्टिहीन मुलांसाठी (मूकबधिर अंधत्व सह) विशेष शाळांचा प्रकल्प समाविष्ट आहे. घर आधारित पुनर्वसन आणि समुदाय-आधारित पुनर्वसन प्रकल्प आणि कमी दृष्टी केंद्र प्रकल्पाचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
विभाग ‘दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती’ नावाची व्यापक योजना देखील राबवत आहे ज्या अंतर्गत मानक दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
विभाग दृष्टिबाधित मुलांसह दिव्यांग व्यक्तींच्या कौशल्य विकासासाठी राष्ट्रीय कृती योजना (NAP-SDP) देखील चालवत आहे.
विभागाच्या राष्ट्रीय निधी अंतर्गत इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या विज्ञान, तंत्रज्ञान, इंजीनियरिंग आणि गणित (एसटीईएम) विषयांचे शिक्षण घेणाऱ्या 100% अंध विद्यार्थ्यांसाठी विभागाच्या अंतर्गत राष्ट्रीय संस्थांमार्फत शिक्षण शुल्काची परतफेड केली जाते.
ही माहिती केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्य मंत्री बी.एल. वर्मा यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.