नागपूर: मंगळवार २९ ऑक्टोबर, उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्व उमेदवारांची सोबत धावपळ झाली.
आज शेवटचा दिवस असल्यामुळे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे सुध्दा प्रचार ताफाबरोबर आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यास निघाले असताना प्रचार ताफ्याची वाहने एकमेकांवर आदळली.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज शेवटचा दिवस असून दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ आहे. अर्ज भरायची तयारी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून मोठ्या उत्साहाने सुरू केली होती. आपल्या प्रदेशाध्यक्षाचे उमेदवारी अर्ज भरायचे उत्साह सुध्दा त्यांच्यात स्पष्ट दिसून येत होते. अर्ज भरण्याची पूर्व तयारी करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात गावोगावी कार्यकर्त्यांना बोलावले होते. परंतु अपेक्षित अशी दुर्देवी घटना त्यांच्या ताफ्याबरोबर झाली.

सावनेर मार्गावरिल अंबिका बार जवळ ही घटना घडली. या घटनेमध्ये भाजपाचे ३ कार्यकर्ते जखमी झाले. जखमी कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यकर्ते श्री हितेश बन्सोड यांच्या मदतीने सावनेरस्थित जीवतोडे हॉस्पिटलला नेण्यात आले. लगेच डॉक्टरांनी जखमी कार्यकर्त्याच्या उपचाराला सुरवात केली.
तसेच माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी स्वतः अर्ज भरण्यासाठी नागपूरात आले आहेत. अर्ज भरल्यानंतर ते कामठीला जाणार आहेत.