Becoming India’s Gadchiroli Steel Hub: Nitin Gadkari | ₹5 Lakh Crore Investment for Vidarbha
आगामी पाच वर्षात गडचिरोली हे भारताचे स्टील हब होईल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी डावोस गुंतवणूकीतील सुमारे 5 लाख कोटींचे करार विदर्भासाठी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती नागपूरमध्ये ‘एडवांटेज विदर्भ 2025- खासदार औद्योगिक महोत्सव’ या तीन दिवसीय औद्योगिक प्रदर्शनीचे उद्घाटन नागपूर
गडचिरोलीतील लोह खनिज देशातील उच्च दर्जाचे असून त्यावर प्रक्रिया उद्योग येत असून येत्या पाच वर्षात देशातील स्टील हब म्हणून उदयास येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरच्या अमरावती रोड स्थित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरा मध्ये आयोजित एडवांटेज विदर्भ 2025- खासदार औद्योगिक महोत्सव या तीन दिवसीय औद्योगिक प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत त्याचप्रमाणे विदर्भातील खासदार, लोकप्रतिनिधी आणि देशातील उद्योजक उपस्थित होते. लॉयड्स मेटल सारख्या उद्योग समूहांनी गडचिरोली मध्ये उद्योग उभारल्याने येथील नक्षलवाद्याचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटला असून युवक आता रोजगाराच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत असे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. नागपूर मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर तसेच अजनी येथील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास , 2400 कोटी रुपयांचा लॉजिस्टिक पार्क ,कार्गो हब, मदर डेअरीचा प्रकल्प अशा विविध विकास प्रकल्पामुळे विदर्भाचा विकास देवेंद्र फडणवीस यांच्या साह्यामुळे दुपटीने होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला . रायपूर ते विशाखापट्टणम 36 हजार्र कोटींचा एक्सप्रेस हायवे आपण तयार करत असल्याचे सांगून गडचिरोली जिल्ह्यातून थेट रायपुर – विशाखापट्टणम एक्सप्रेस हायवेला जोडून आपण माल निर्यात करू शकाल आणि गरज भासल्यास काकीनाडाला देखील घेऊन जाऊ म्हणजे मुंबईला जाण्याची गरज न पडता दळणवळणाचे खर्च कमी होतील आणि जगभरात इथून निर्यात होईल असेही गडकरी म्हणाले.

डॉवोस जागतिक व्यापार परिषदेच्या दौऱ्याच्या माध्यमातून 5 लाख कोटी रुपयाचे सामंजस्य करार विदर्भासाठी करण्यात आले असून स्टील , इलेक्ट्रॉनिक व्हेईकल , सोलर बॅटरी , नवीकरणीय ऊर्जा अशा विविध क्षेत्रातील उद्योग विदर्भात स्थापन होणा असून विदर्भाचा विकास झपाटाने होत असल्याच प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलताना केले .अमरावती मध्ये टेक्स्टाईल झोन विकसित झाला असून केंद्र सरकारच्या ‘पीएम मित्रा’ पार्कच्या माध्यमातून येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे अमरावतीत ‘कॉटन टू फॅशन’ अशी एक परिसंस्था तयार झाली असल्याचे देखील त्यांनी सांगितलं .विदर्भात एक नवीन इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार होत असून मोठ्या प्रमाणात उद्योग विदर्भात येऊन या क्षेत्रात रोजगार गुंतवणूक आणि समृद्धी निर्माण होईल असा देखील विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक या प्रदर्शनाचे आयोजक आणि असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे, यांनी तर आभारप्रदर्शन सचिव डॉ. विजय कुमार शर्मा यांनी केले.

अॅडव्हांटेज विदर्भ २०२५ विषयी : अॅडव्हांटेज विदर्भ २०२५ – , हा मेगा इंडस्ट्रियल एक्स्पोआज पासून 9 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहेया औद्योगिक प्रदर्शनात विविध उत्पादने आणि बहु-क्षेत्रीय उद्योगांचे ३०० हून अधिक स्टॉल राहणार आहेत. त्यापैकी १०० स्टॉल सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. इतर स्टॉलमध्ये संरक्षण सार्वजनिक उपक्रम, स्टील आणि खाण मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, सेबी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, जीएसटी विभाग, पोस्ट विभाग, सरकारी ई-मार्केटप्लेस (जीईएम), शैक्षणिक संस्था यासारख्या सरकारी विभागांमधील विविध क्षेत्रातील उत्पादन श्रेणी, यंत्रसामग्री आणि सेवा प्रदर्शित केल्या जातील.या कार्यक्रमात स्टील, संरक्षण, विमान वाहतूक, बांबू, दुग्धव्यवसाय, शिक्षण, आयटी आणि आयटीईएस, लॉजिस्टिक्स, स्टार्टअप्स, फार्मास्युटिकल्स, अक्षय ऊर्जा, पर्यटन, वस्त्रोद्योग, रत्ने आणि दागिने, स्टार्टअप इकोसिस्टम एंगेजमेंट यासह विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय चर्चासत्रे आणि तांत्रिक चर्चा आयोजित केल्या जातील.अॅडव्हान्टेज विदर्भ मध्ये पहिल्यांदाच पेटंट गॅलरी प्रदर्शित केली जात आहे. यात पर्यावरण/सामाजिक प्रभाव, कोअर इंडस्ट्री, केमिकल, हेल्थ टेक्नॉलॉजी, बायोटेक, अॅग्रोटेक, आयओटी/रोबोटिक्स/एआय आणि फिनटेक या श्रेणींतील एकुण 41 पेटंटचा समावेश राहणार आहे. विद्यार्थी व्यावसायिकीकरण आणि इन्क्युबेशसाठी तयार असलेले हे आपले नवोपक्रम प्रोटोटाईप येथे प्रदर्शित करतील.याशिवाय विविध फूड कोर्ट, मनोरंजनासाठी गेमिंग आणि ई-गेमिंग झोन, फॅशन शो, बँड स्पर्धा यांनाही एक्स्पोमध्ये स्थान देण्यात आले आहे. भारत मोबिलिटी येथे लाँच केलेली दुचाकी आणि चारचाकी ई-वाहने देखील प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहेत.९ फेब्रुवारी रविवार रोजी सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या समारोप समारंभाला केंद्रीय वाणिज्य मंत्री माननीय पीयूष गोयल, मुख्य संरक्षक नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल, संजय राठोड, अॅड. आशिष जयस्वाल, पंकज भोयर आणि इंद्रनील नाईक यांची उपस्थित राहणार आहे