By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
policetimesnews.compolicetimesnews.compolicetimesnews.com
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • गुन्हे
  • क्रीडा
  • व्यापार व उद्योग
Search

Archives

  • February 2025
  • January 2025
  • December 2024
  • November 2024
  • October 2024

Categories

  • क्रीडा
  • गुन्हे
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • व्यापार व उद्योग
  • Advertise
© 2024 Police Times News. All Rights Reserved.
Reading: Prime Minister Narendra Modi 13 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर महाकुंभ मेळा 2025 च्या विकासकामांची पाहणी Prime Minister Narendra Modi करणार
Share
Notification Show More
Font ResizerAa
policetimesnews.compolicetimesnews.com
Font ResizerAa
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • गुन्हे
  • क्रीडा
  • व्यापार व उद्योग
Search
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • गुन्हे
  • क्रीडा
  • व्यापार व उद्योग
Follow US
  • Advertise
© 2024 Police Times News. All Rights Reserved.
policetimesnews.com > ताज्या बातम्या > Prime Minister Narendra Modi 13 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर महाकुंभ मेळा 2025 च्या विकासकामांची पाहणी Prime Minister Narendra Modi करणार
ताज्या बातम्यादेशमहाराष्ट्रराजकारण

Prime Minister Narendra Modi 13 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर महाकुंभ मेळा 2025 च्या विकासकामांची पाहणी Prime Minister Narendra Modi करणार

"Empowering Progress: Prime Minister's Vision for Uttar Pradesh's Development and Innovation"

Police Times News Desk
Last updated: 13/12/2024 5:21 PM
Police Times News Desk
Share
13 Min Read
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis , यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis , Prime Minister Narendra Modi यांची भेट घेतली.
SHARE

Prime Minister Narendra Modi 13 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर महाकुंभ मेळा 2025 च्या विकासकामांची पाहणी Prime Minister Narendra Modi करणार


प्रयागराज येथे 6670 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान करणार

पंतप्रधान कुंभ सहायक चॅटबॉटचे अनावरण करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 डिसेंबरला उत्तर प्रदेशला भेट देणार आहेत.  प्रयागराज येथे ते  दुपारी 12.15 च्या सुमाराला  संगमावर दर्शन घेतील आणि पूजा करतील. त्यानंतर दुपारी 12:40 च्या सुमारास पंतप्रधान अक्षय वटवृक्षाची पूजा करतील आणि त्यानंतर हनुमान मंदिर आणि सरस्वती कूप येथे दर्शन आणि पूजा करतील. दुपारी दीडच्या सुमारास ते महाकुंभ प्रदर्शनाच्या ठिकाणाची पाहणी करतील. पंतप्रधान त्यानंतर दुपारी 2 च्या  सुमारास प्रयागराज येथे 6670 कोटी रुपयांपेक्षा अधिक  किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील.

Contents
Prime Minister Narendra Modi 13 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर महाकुंभ मेळा 2025 च्या विकासकामांची पाहणी Prime Minister Narendra Modi करणारप्रयागराज येथे 6670 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान करणारपंतप्रधान कुंभ सहायक चॅटबॉटचे अनावरण करणारमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेटएक व्हिडिओ पोस्ट X वर शेअर करताना त्यांनी लिहिले आहे : केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाद्वारे राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन सहकाऱ्यांसाठी विशेष कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजनग्राहकांच्या तक्रारींचे प्रभावीपणे निराकरण करणे हे सहकाऱ्यांसाठीच्या क्षमता निर्मिती कार्यक्रमाचे उद्दिष्ट : सचिव, ग्राहक व्यवहार विभागपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या सहभागींशी साधला संवादकेंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या भव्य अंतिम फेरीचे केले उद्घाटन महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर 7 व्या स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2024 च्या भव्य अंतिम सोहळ्याचे भूषवत आहेत यजमानपद स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024: वास्तविक जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांकरिता एक राष्ट्रव्यापी नवोन्मेष आव्हानSIH बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

पंतप्रधान महाकुंभ मेळा 2025 साठी विविध प्रकल्पांचे उद्घाटन करतील. यामध्ये पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणि प्रयागराजमध्ये उत्तम वाहतूक सुविधा देण्यासाठी  10 नवीन रोड ओव्हर ब्रिज (RoBs) किंवा उड्डाणपूल, कायमस्वरूपी घाट आणि नदीकिनारी रस्ते यासारख्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचा समावेश असेल.

गंगेच्या पाण्यात प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याचा विसर्ग  होऊ नये यासाठी  नदीकडे जाणारे छोटे नाले अडवणे, वेगळे फाटे काढणे, अडवणे, प्रक्रिया करणे अशा विविध प्रकल्पांचे उदघाटन पंतप्रधान, स्वच्छ आणि निर्मळ गंगेसाठीच्या आपल्या वचनबद्धतेनुसार करतील.  पिण्याचे पाणी आणि वीज यासंबंधीच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटनही ते करणार आहेत.

पंतप्रधान प्रमुख मंदिरांच्या मार्गिकांचे उदघाटनही करणार आहेत. यात, भारद्वाज आश्रम, शृंगवरपूर धाम, अक्षयवट, हनुमान मंदिर यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे भाविकांना मंदिरात प्रवेश करणे अधिक सोपे होईल आणि यामुळे आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल.

पंतप्रधान कुंभ सहायक(Sah’AI’yak) चॅटबॉटचे  देखील अनावरण करतील.  महाकुंभ मेळा 2025 साठी येणाऱ्या भक्तांना कार्यक्रमांबद्दल अद्यावत माहिती देण्यासाठी आणि  मार्गदर्शन करण्यासाठी  तपशील प्रदान करेल.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाच्या एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट पुढीलप्रमाणे:

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis , यांनी Prime Minister Narendra Modi यांची भेट घेतली.

जल जीवन अभियान महिला सक्षमीकरणाला विशेषतः ग्रामीण भागातल्या महिला सक्षमीकरणाला चालना देत आहे : पंतप्रधान

जल जीवन अभियान महिला सक्षमीकरणाला विशेषतः ग्रामीण भागातल्या महिला सक्षमीकरणाला चालना  देत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दारी स्वच्छ पाणी उपलब्ध झाल्यामुळे महिला आता कौशल्य विकास आणि आत्मनिर्भरतेकडे लक्ष पुरवू शकतात. 

एक व्हिडिओ पोस्ट X वर शेअर करताना त्यांनी लिहिले आहे : 

”जल जीवन मिशन महिला सक्षमीकरणाला विशेषतः ग्रामीण भागातल्या महिला सक्षमीकरणाला कशी चालना देत आहे, त्याचा एक उत्तम पैलू. दारी स्वच्छ पाणी उपलब्ध झाल्यामुळे महिला आता कौशल्य विकास आणि आत्मनिर्भरतेकडे लक्ष पुरवू शकतात.”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis , यांनी Prime Minister Narendra Modi यांची भेट घेतली.

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाद्वारे राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन सहकाऱ्यांसाठी विशेष कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन


ग्राहकांच्या तक्रारींचे प्रभावीपणे निराकरण करणे हे सहकाऱ्यांसाठीच्या क्षमता निर्मिती कार्यक्रमाचे उद्दिष्ट : सचिव, ग्राहक व्यवहार विभाग

न्यायालयीन प्रक्रिया-पूर्व टप्प्यावर तक्रार निवारण पुनर्परिभाषित करण्याच्या निरंतर  प्रयत्नांचा भाग म्हणून  ग्राहक व्यवहार विभागाने यावर्षी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर आपल्या सहकाऱ्यांसाठी क्षमता निर्मिती  कार्यक्रम सुरू केला आहे.

क्षमता निर्मिती कार्यक्रमात  राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन सहकाऱ्यांसाठी  विशेष उच्च कौशल्य प्रशिक्षण उपक्रमांचा समावेश आहे . राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन सहकाऱ्यांचे कौशल्य आणि ज्ञान वाढवणे, ग्राहकांच्या तक्रारी प्रभावीपणे सोडवण्यासाठी सक्षम बनवणे आणि हेल्पलाईनद्वारे सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे. विभागाच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून, हा उपक्रम ग्राहक तक्रार निवारणामध्ये सहभागी  कर्मचाऱ्यांची क्षमता बळकट करण्याचा प्रयत्न करतो, ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा आणि सहाय्य मिळेल याची काळजी घेतो.

या प्रयत्नात, विभागाने 11 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या सहकाऱ्याना ग्राहकांच्या तक्रारी हाताळण्याबाबत  विशेष प्रशिक्षण देण्यासाठी अमेझॉन इंडियाची मदत घेतली आहे. सहकाऱ्यांमध्ये  सॉफ्ट स्किल्स, व्यावसायिक दृष्टीकोन आणि अत्यावश्यक ग्राहक सेवा वर्तन विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करणारा 40-तासांचा विशेष  प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच पार पाडला. क्षमता निर्मिती कार्यक्रम पूर्ण झाल्यावर, सहभागींना ग्राहक व्यवहार विभाग आणि अमेझॉन इंडियाकडून संयुक्त प्रमाणपत्र प्राप्त होईल. हे प्रमाणपत्र ग्राहक तक्रार निवारणातील त्यांची वर्धित कौशल्ये आणि ज्ञान यांचा गौरव असून ते त्यांना राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनद्वारे उत्कृष्ट समर्थन प्रदान करण्यास सक्षम करते. देशभरातील 17 भाषांमध्ये (म्हणजे हिंदी, इंग्रजी, काश्मिरी, पंजाबी, नेपाळी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम, मैथली, संथाली , बंगाली, ओडिया, आसामी, मणिपुरी)  देण्यात येत असून सध्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनचे  व्यवस्थापन पाहते.

यावेळी बोलताना, केंद्र  सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे म्हणाल्या, “सरकार ग्राहक हक्क कायम राखण्याच्या आणि त्यांचे संरक्षण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहे. यासाठी जबाबदारी, पारदर्शकता आणि निष्पक्षता वाढवण्यासाठी तक्रारी ऐकण्याचा आणि त्यांचे निराकरण करण्याचा अधिकार आवश्यक आहे.  हेल्पलाईनची कामगिरी उंचावणे हे अमेझॉन इंडियाद्वारे दिले जाणाऱ्या  प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आहे आणि क्षमता निर्मिती  कार्यक्रमाचा एक भाग आहे आणि राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन व्यवस्था  मजबूत करण्याच्या दिशेने सुरु  असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे, ज्यावर  दरमहा एक लाखाहून अधिक तक्रारी येतात. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन सहयोगींच्या  नियमित प्रशिक्षणामुळे ग्राहकांच्या तक्रारींचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी त्यांचे संभाषण कौशल्य सुधारण्यास मदत करेल आणि ग्राहकांना विनाव्यत्यय विवाद निवारणाचा अनुभव मिळेल.

ॲमेझॉनच्या आंतरराष्ट्रीय सार्वजनिक धोरण उपाध्यक्ष सुझन पॉइंटर यांनी सांगितले, “ॲमेझॉनमध्ये ग्राहकाचा ध्यास हा सर्व बाबींच्या केंद्रस्थानी असतो. भविष्यातील ई-कॉमर्सची वाढ ग्राहकांचे सक्षमीकरण व शिक्षणावर अवलंबून आहे यावर आमचा विश्वास आहे. ग्राहक व्यवहार विभागाला आम्ही व्यवहाराच्या आमच्या उत्तम सवयींची माहिती देण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. त्यातून ग्राहक तक्रार निवारणाची व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या आमच्या महत्त्वाच्या ध्येयाला पाठबळ मिळेल. यामुळे विश्वासार्हता वाढून आणखी ग्राहक ऑनलाईन खरेदीकडे वळतील.”

तसेच, ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय विधी विद्यापीठ, दिल्लीच्या सहयोगाने राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन (एनसीएच) च्या भागीदारांसाठी एक दिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन केले होते. ही कार्यशाळा 30 नोव्हेंबर 2024 रोजी एनएलयूडी कॅम्पस, द्वारका, नवी दिल्ली इथे पार पडली. यातील चार सत्रांपैकी दोन सत्रांमध्ये ग्राहक संरक्षण कायदा 2019 शी संबंधित समस्यांवर लक्ष केंद्रित केले होते. ग्राहक-केंद्रित समकालीन समस्या जसे की दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, ई-कॉमर्स, झटपट कॉमर्स, काळे व्यवहार, ग्रीनवॉशिंग (पर्यावरणस्नेही असल्याची दिशाभूल), हेल्थवॉशिंग (आरोग्यविषयक दिशाभूल) आणि दुय्यम जाहिरातींचा त्यात समावेश होता. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी भागीदारांना आवश्यक ज्ञान व कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याच्या हेतूने ही सत्रे आयोजित करण्यात आली होती.

क्षमता बांधणी कार्यक्रम आणि परिवर्तनकारी बदलांसह एनसीएचमध्ये तंत्रज्ञानाधारित सुधारणा घडवून आणल्यामुळे एनसीएच हे देशभरातील ग्राहकांना न्यायालयीन कारवाईपूर्वी तक्रार निवारणाची सुविधा देणारी एकछत्री व्यवस्था म्हणून उदयाला येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या सहभागींशी साधला संवाद


केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या भव्य अंतिम फेरीचे केले उद्घाटन महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर 7 व्या स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2024 च्या भव्य अंतिम सोहळ्याचे भूषवत आहेत यजमानपद स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024: वास्तविक जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांकरिता एक राष्ट्रव्यापी नवोन्मेष आव्हान

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या अंतिम फेरीच्या उद्घाटन दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युवा नवोन्मेषकांशी संवाद साधला. आजचा भारत सर्वांच्या प्रयत्नांसह वेगाने प्रगती करू शकतो आणि आजचा उपक्रम हे  त्याचे उदाहरण आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.  “स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या महाअंतिम फेरीची मी आतुरतेने वाट पाहत होतो”, असे पंतप्रधान म्हणाले.  युवा नवोन्मेषकांसोबत आपल्याला  काहीतरी नवीन शिकण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळते, असे पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केले. पंतप्रधानांशी झालेल्या संवादादरम्यान, वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च, मुंबईच्या मिस्टिक ओरिजनल्सच्या टीम लीडरने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडद्वारे प्रदान केलेल्या सुरक्षा आव्हानाचा सामना करण्याविषयी माहिती दिली.  याअंतर्गत माइक्रो डॉपलर आधारित लक्ष्य वर्गीकरण, जसे की देण्यात आलेली वस्तू पक्षी आहे की ड्रोन ओळखण्यास साहाय्यभूत करण्याचे आव्हान त्यांना देण्यात आले. टीम लीडरने अधिक माहिती देताना सांगितले, रडारवर पक्षी आणि ड्रोन सारखे दिसत असल्याने चुकीचा इशारा दिला जाऊ शकतो आणि यातून संभाव्य सुरक्षा धोका, विशेषतः संवेदनशील क्षेत्रात उद्भवू शकतो.

चमूतल्या दुसऱ्या सदस्याने उपायाचे तपशीलवार विश्लेषण सादर केले.  मानवाच्या वैशिष्ट्यपूर्ण  बोटांच्या ठशांप्रमाणेच  मायक्रो डॉप्लर सिग्नेचर्स विविध वस्तूंद्वारे निर्माण होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण नमुन्यांचा उपयोग करते. त्यावर पंतप्रधानांनी विचारले, उपायांतर्गत वेग, दिशा आणि अंतर ओळखता येते का? त्यावर हे लवकरच साध्य होईल, असे चमूतल्या सदस्याने सांगितले. ड्रोनचे विविध सकारात्मक उपयोग आहेत, मात्र  काही शक्ती ड्रोन्सचा उपयोग इतरांना इजा पोहोचवण्यासाठी करतात आणि हे सुरक्षा आव्हान बनले असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. अशा प्रकारचे आव्हान भेदण्यास उपाय सक्षम आहे का, या पंतप्रधानांच्या प्रश्नावर चमूतल्या सदस्याने प्रक्रिया विशद केली. हे एक कॉम्पॅक्ट सोल्यूशन असून हे  किफायतशीर उपकरणांवर वापरले जाऊ शकते आणि विविध प्रकारच्या वातावरणात अनुकूल आहे. पंतप्रधानांनी देशातील विविध क्षेत्रात ड्रोनच्या वापरावर प्रकाश टाकला आणि नमो ड्रोन दीदी योजनेचे उदाहरण दिले. देशातील दुर्गम भागात औषधे आणि अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी ड्रोनच्या वापराचा  उल्लेखही त्यांनी केला.  तर शत्रू त्यांचा वापर सीमेपलीकडून बंदुक आणि अमली  पदार्थांची तस्करी करण्यासाठी करतात.

राष्ट्रीय सुरक्षेच्या अशा समस्यांना तोंड देण्यासाठी युवा नवोन्मेषक अत्यंत गांभीर्याने काम करत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या सहभागींसोबत पंतप्रधानांनी साधलेल्या  संवादाबद्दल येथे अधिक जाणून घ्या.त्यापूर्वी दिवसाच्या सुरुवातीला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन  2024 च्या भव्य अंतिम फेरीचे आभासी माध्यमातून उदघाटन केले. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार देखील उदघाटन समारंभाला उपस्थित होते. उदघाटन समारंभाबद्दल येथे आणखी वाचा.  7वी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (SIH) 11 डिसेंबर 2024 रोजी देशभरातील 51 नोडल केंद्रांवर एकाच वेळी सुरू झाली. सॉफ्टवेअर एडिशन सलग 36 तास चालेल, तर हार्डवेअर एडिशन 11 ते 15 डिसेंबर 2024 पर्यंत सुरू राहील.महाराष्ट्रात, मुंबई, पुणे आणि नागपूर ही शहरे  स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या महाअंतिम फेरीचे यजमानपद  भूषवत असून  तिन्ही केंद्रांमध्ये राष्ट्रीय उद्घाटनापूर्वी कार्यक्रमाचे स्थानिक उद्घाटन झाले.

स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 चे मुंबईतील आयोजन स प मंडळी यांच्या  प्रिं. एल एन वेलिंगकर व्यवस्थापन विकास व संशोधन संस्थेने केले आहे. उदघाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश ब्राह्मणकर, नवोन्मेष संचालक, शिक्षण मंत्रालय , तर मान्यवर अतिथी म्हणून राहुल चंदेलिया, मुख्य कार्यकारी अधिकारी, WOL3D, निलेश लेले,अध्यक्ष, लघु व मध्यम उद्योग विकास मंडळ, कॅप्टन मयांक कुक्रेती,(राष्ट्रीय सुरक्षा बल ) आणि वेंकट नागभूषणम जेट्टी, उप व्यवस्थापक, भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. उपस्थित होते.  

स्पर्धा केंद्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता / मशीन लर्निंग, अनॅलिटीक्स, इमेज अनॅलिटीक्स व प्रॉब्लेम स्टेटमेंट्स या विषयांवरील स्पर्धांमध्ये  34 संघ सहभागी झाले होते. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 चा  मुंबईतील समारोप 12 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळच्या समारोप सत्रानंतर होईल.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या भोपाळच्या ओरिएंटल विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेच्या मुस्कान मिश्रा हिने सांगितले, “आम्ही महिलांची सुरक्षा हा विषय निवडला होता. महिलांना त्यांच्या आयुष्यात कोणकोणत्या अडचणी येतात याबद्दल एक अल्गोरिदम वापरून त्यावर उपाययोजना कशी करावी हे सांगणारे एक ऍप आम्ही विकसित केले होते. आम्हाला आशा आहे कि आम्ही हि स्पर्धा नक्कीच जिंकू.”

पुण्यामधील स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 चे आयोजन एम आय टी कला, डिझाईन व तंत्रज्ञान विद्यापीठाने केले होते. पुण्यातील या कार्यक्रमाला अभिषेक रंजन, नवोन्मेष अधिकारी,  शिक्षण मंत्रालय, डॉ मोहित दुबे, प्रकुलगुरू, एम आय टी ए डी टी विद्यापीठ, डॉ महेश चोपडे, रजिस्ट्रार, डॉ रेखा सुगंधी, नोडल अधिकारी, तसेच इतर अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.

स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 साठी निवडलेल्या देशभरातल्या 51 नोडल केंद्रांमध्ये नागपूरच्या  जी एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड झाली होती. या केंद्रात 20 संघांनी नोंदणी केली होती. त्यातील सॉफ्टवेअर विभागात 11 व 12 डिसेंबर रोजी होणाऱ्या स्पर्धांमध्ये  120 स्पर्धक व 24 मेंटॉर समाविष्ट आहेत. उदघाटन समारंभात सुनील रायसोनी, संचालक, रायसोनी समूह, शिव सोनी, वरिष्ठ टेक्निकल आर्किटेक्ट, इन्फोसिस, डॉ रिझवान अहमद, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, डेलाप्लेक्स आणि सुनील उंटवाले, संचालक, जी. एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय,हिंगणा, नागपूर हे उपस्थित होते.

स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 बद्दल माहिती:

दैनंदिन आयुष्यातील महत्वाच्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यादृष्टीने आयोजित केलेला स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन हा एक राष्ट्रव्यापी उपक्रम आहे. नवोन्मेष व समस्या निराकरणासाठीचे व्यावहारिक कौशल्य विकसित करणारी संस्कृती जोमाने तयार व्हावी यासाठी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन (SIH) मध्ये दैनंदिन आयुष्यातील समस्यांवर व्यवहार्य उपाययोजना सुचवू शकणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी देशव्यापी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते.

SIH बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

यावर्षी 54 मंत्रालये, विभाग, राज्य सरकारे, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या व उद्योगांकडून 250 समस्या विधाने प्राप्त झाली होती. संस्था पातळीवरील अंतर्गत हॅकॅथॉन च्या संख्येत 150% वाढ झाली असून 2023 सालात आयोजित झालेल्या 900  हॅकॅथॉन वरून ही संख्या 2024 सालात 2,247 पर्यंत पोचली आहे. त्यामुळे यावर्षीचे आयोजन आतापर्यंतचे सर्वात मोठे आयोजन ठरले आहे. SIH 2024 मध्ये संस्था पातळीवर 86,000 हुन अधिक संघ सहभागी झाले असून संस्थांनी 49,000 विद्यार्थी संघ ( प्रत्येकी 6 विद्यार्थी व 2 मेंटॉर्स) राष्ट्रीय पातळीवर पाठवले  होते.  

यावर्षीदेखील मंत्रालये, विभाग  व उद्योगांनी 17 राष्ट्रीय महत्वाच्या विषयांमधून विद्यार्थी नवोन्मेष श्रेणीसाठी सादर केलेल्या कल्पनांवर विद्यार्थ्यांचे संघ काम करणार आहेत. या मध्ये आरोग्यसेवा, पुरवठा साखळी व लॉजिस्टिकस, स्मार्ट तंत्रज्ञान, परंपरा व संस्कृती, शाश्वत विकास, शिक्षण व कौशल्य विकास, पाणी, कृषी व अन्न, उभरते तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन या विषयांचा समावेश होता.

यावर्षीच्या उपक्रमात इसरो ने सादर केलेले चंद्रावरील अंधारलेल्या भागाचे चित्रण, जल शक्ती मंत्रालयाने सादर केलेली उपग्रह माहिती, IoT, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित गंगा नदी पाणी गुणवत्ता सर्वेक्षण पद्धत आणि आयुष मंत्रालयाने सादर केलेले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्मार्ट योग मॅट ही काही उल्लेखनीय समस्या विधाने होती.

Preet Shah, Team lead of team Ventraguard from Sarvajanik College of Engineering and Technology, Surat talked about his team's project at #SmartIndiaHackathon – Hardware Edition Grand Finale 2024.

#SIH2024@SIH2024_MIC @AICTE_INDIA @EduMinOfIndia @PIB_India @PIBAhmedabad pic.twitter.com/tet3HadCNb

— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) December 11, 2024

Mayur Borkar of Innovation cell , AICTE informs about the activities under 7th Edition of Grand Finale of SIH being held in the GH Raisoni College of Engineering Nagpur.#SmartIndiaHackathon #SIH2024@SIH2024_MIC @AICTE_INDIA @EduMinOfIndia @PIB_India @airnews_nagpur pic.twitter.com/mlIcyT9HaB

— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) December 11, 2024

You Might Also Like

IIFA 2025 की भव्य सिल्वर जुबली में शिरकत करेंगे Nandamuri Balakrishna

Nagpur Hosts 5-Day HRD Program on Integrated Pest Management

Becoming India’s Gadchiroli Steel Hub: Nitin Gadkari | ₹5 Lakh Crore Investment for Vidarbha

India Clinches Thrilling Victory in 1st ODI 2025 Against England at Nagpur

Dr. Shriram Kandhare Honored for His Research on Nitin Gadkari

TAGGED:Akshay Vat worshipAmazon India trainingclean Ganga missionclean water missioncustomer grievance redressale-commerce customer complaintseducation innovation Indiagovernment initiatives 2024India governmentinfrastructure projectsKumbh Mela projectsMahakumbh Mela 2025Maharashtra CM meetingNarendra Modi PrayagrajNational Consumer HelplinePolice Times NewsPrayagraj bridgesPrayagraj development projectsPrime Minister visitreligious tourism in Indiarural women empowermentSah’AI’yak chatbotSmart India Hackathon 2024technology innovationUttar Pradesh visitWomen empowerment rural India

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
News Letter Sign up
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Share
Previous Article राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू श्री. प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी त्यांना वाहिली आदरांजली
Next Article दिव्यांगांना दिलासा; निराधारांना आधार Nitin Gadkari public outreach
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
- Advertisement -

Latest News

MP Bhajan Competition 2025
GuruMauli Bhajan Mandal Wins MP Bhajan Competition 2025!
ताज्या बातम्या देश 05/02/2025
kanchanatai gadkari
Kanchanatai Gadkari Leads Charitable Hospitals: A New Era Begins!
ताज्या बातम्या 05/02/2025
Mahakumbh 2025
Mahakumbh 2025 : Where Spirituality Meets Emotional Healing
ताज्या बातम्या 01/02/2025
credit to Instagram
Salman Khan Shares Life Lessons with Nephew Arhaan, Says “You Will Hate Me…”
ताज्या बातम्या 01/02/2025

Recent Posts

  • IIFA 2025 की भव्य सिल्वर जुबली में शिरकत करेंगे Nandamuri Balakrishna
  • Nagpur Hosts 5-Day HRD Program on Integrated Pest Management
  • Becoming India’s Gadchiroli Steel Hub: Nitin Gadkari | ₹5 Lakh Crore Investment for Vidarbha
  • India Clinches Thrilling Victory in 1st ODI 2025 Against England at Nagpur
  • Dr. Shriram Kandhare Honored for His Research on Nitin Gadkari

Recent Comments

  1. Nagpur Hosts 5-Day HRD Program on Integrated Pest Management - policetimesnews.com on Becoming India’s Gadchiroli Steel Hub: Nitin Gadkari | ₹5 Lakh Crore Investment for Vidarbha
  2. Becoming India’s Gadchiroli Steel Hub: Nitin Gadkari | ₹5 Lakh Crore Investment for Vidarbha - policetimesnews.com on India Clinches Thrilling Victory in 1st ODI 2025 Against England at Nagpur
  3. India Clinches Thrilling Victory in 1st ODI 2025 Against England at Nagpur - policetimesnews.com on Dr. Shriram Kandhare Honored for His Research on Nitin Gadkari
  4. Dr. Shriram Kandhare Honored for His Research on Nitin Gadkari - policetimesnews.com on GuruMauli Bhajan Mandal Wins MP Bhajan Competition 2025!
  5. Kanchanatai Gadkari Leads Charitable Hospitals: A New Era Begins! - policetimesnews.com on Mahakumbh 2025 : Where Spirituality Meets Emotional Healing

You Might also Like

Budget 2025 Highlights
ताज्या बातम्यादेश

Budget 2025 Highlights : टैक्स में बड़ी राहत, 12 लाख तक इनकम टैक्स फ्री!

01/02/2025
Shahrukh Mulani
ताज्या बातम्यादेशमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील सर्व कार्यालयांमध्ये राष्ट्रगीताने कामकाजाची सुरुवात करा – Shahrukh Mulani

30/01/2025
ममता कुलकर्णी
ताज्या बातम्या

महाकुंभ 2025: महामंडलेश्वर बनीं ममता कुलकर्णी, बाबा रामदेव ने जताई आपत्ति

29/01/2025
Stage Collapse Tragedy
ताज्या बातम्या

Shocking Stage Collapse Tragedy at Baghpat Festival: 7 Dead, 40 Injured

28/01/2025
Previous Next
//

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet

Quick Link

  • MY BOOKMARK
  • INTERESTSNew
  • CONTACT US
  • BLOG INDEX

Top Categories

  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • गुन्हे
  • क्रीडा
  • व्यापार व उद्योग

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

News Letter Sign up
policetimesnews.compolicetimesnews.com
Follow US
© 2024 Police Times News. All Rights Reserved.
  • Advertise
Police Times News Police Times News
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?