विधानसभा निवडणुकीतील पश्चिम नागपुरात सर्वांत भव्य आणि प्रभावी प्रचार!
जागोजागी पुष्पवृष्टी, नागरिकांची रस्त्याच्या दुतर्फा गर्दी बदलाव की आंधी, राहुल संग प्रियंका गांधी’चा सर्वत्र जयघोष
नागपुर : महाविकास आघाडीचे काँग्रेसचे पश्चिम नागपुरचे उमेदवार व विद्यमान आमदार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा रविवारी भव्य ‘रोड-शो’ केला. दुपारी चार वाजताच्या दरम्यान सुरू झालेल्या भव्य ‘रोड-शो’ला हजारोंच्या संख्येत आलेल्या पश्चिम नागपूर वासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे महाराष्ट्रात सुरू असलेल्या निवडणुकांच्या रणधुमाळीत आतापर्यंतचा सर्वात मोठा ‘रोड-शो’ पश्चिम नागपुरात झाल्याने हा दिवसभर चर्चेचा विषय राहिला. यावेळी दोन्ही बाजुंला हजारों नागरिकांची गर्दीने काँग्रेसचे पश्चिम नागपुरचे उमेदवार व विद्यमान आमदार विकास ठाकरे यांचा दुसऱ्यांदा विजय निश्चित असल्याची प्रचिती यातून दिसून आली.
दुपारी चार वाजताच्या दरम्यान अवस्थी चौकातून सुरुवात झालेल्या भव्य ‘रोड-शो’ पुढे दिनाशॉ फॅक्ट्री चौक मार्गासाठी निघाली. यावेळी प्रियंका गांधीचे जागो-जागी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यात्रे दरम्यान प्रियंका गांधी आणि उमेदवार विकास ठाकरे यांनी सर्वांना हात उंचावून अभिवादन करत होते. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते भूपेश बघेल, वरिष्ठ नेते मोहन प्रकाश, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, दक्षिण नागपुरचे उमेदवार गिरीश पांडव, दक्षिण-पश्चिम नागपुरचे उमेदवार प्रफुल गुडधे पाटील, विशाल मुत्तेमवार, माजी आमदार प्रकाश गजभिये, अनिस अहमदसह महाविकास आघाडीचे सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येत प्रचारार्थ उपस्थित होते. भव्य अश्या प्रचार रैलीत ‘बदलाव की आंधी, राहुल संग प्रियंका गांधी’, विकासजी ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘काँग्रेस पार्टी जिंदाबाद, ‘महाविकास आघाडीचा विजय असो’, अशा घोषणा देत उपस्थित जनसमुदायाने त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रियंका गांधी यांना पाहण्यासाठी ‘रोड-शो’च्या मार्गावर दोन्ही बाजुंनी पश्चिम नागपुरकरांची मोठी गर्दी झाली होती. लोकं आपापल्या मोबाईल मधून यात्रेची क्षणचित्रेही टिपत होती. दोन्ही मार्गाने जात असलेल्या प्रचार रॅलीत जागो-जागी पुष्पवृष्टी करून प्रियंका गांधीचे स्वागत केले. रॅलीत एका पाच वर्षाच्या चिमुकल्याने फुलांच्या हार प्रियंका गांधी यांना देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी त्या चिमुकल्याचे अभिवादन स्वीकारून भव्य ‘रोड-शो’ पुढे दिनशॉ फॅक्ट्री मार्गाने प्रचारार्थ निघाला.
बाबासाहेबांचा फोटों उंचावत प्रियंका गांधींचे अभिवादन
भव्य ‘रोड-शो’मध्ये सहभागी झालेल्या एका कार्यकर्त्यांने प्रियंका गांधी यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो भेट स्वरूपात दिले. यावेळी प्रियंका गांधींनी फोटो डोक्याच्यावर उंचावत बाबासाहेंबाना त्यांना अभिवादन व्यक्त केले. तर पुढे एका महिला कार्यकर्ता हिने प्रियंका गांधी यांना संविधानाची पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले. याच दरम्यान काही चिमुकल्यांना प्रियंका गांधी यांनी आपले ओटोग्राफ देत आगे बढो अश्या त्या म्हणाल्या.
आतिषबाजी करून कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
भव्य ‘रोड-शो’ मार्गावर जागोजागी महाविकास आघाडीचे बॅनर आणि ध्वज लावण्यात आले होते. तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी भव्य स्टेज उभारून प्रियंका गांधी यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. मुख्य चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहण्याजोगा होता. ‘रोड-शो’च्या दोन्ही बाजूने तिरंगा रंगाचे पताका लावून परिसर काँग्रेसमय झाल्याचे दिसून आले. महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने वाहतुक व सुरक्षा व्यवस्था चोख सांभाळली.