जनतेय ने ठरवलय दुसऱ्यांदा पश्चिमचा आमदार विकास ठाकरेच पश्चिम नागपूरच्या ‘विकास’ पुरुषाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बेरोजगारांना महिना ४ हजार, २५ लाखांपर्यंतचा आरोग्य विमा
नागपुर : पश्चिम नागपुर मतदारसंघातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण देण्यासाठी आपण कटिबध्द आहोत. युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार, नोकरी उपलब्ध करण्यासाठी महाविकास आघाडीने राज्यात पंचसूत्री योजना आखल्या आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा 4 हजार, महिलांना महालक्ष्मी योजनेतून 3 हजार रुपये तसेच 25 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जाणार आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढाईत पश्चिम नागपुरच्या मतदारांना महाविकास आघाडीची साथ दिली पाहिजे. प्रसिद्धी पत्रका द्वारे महाविकास आघाडीचे उमेदवार व पश्चिम नागपुरचे विद्यमान आमदार, नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी व्यक्त केला.
जन-आशीर्वाद यात्रेत गुरुवारी शारदा माता चौकात एका छोटेखानी सभेत जनतेने विकास ठाकरेंचा जल्लोषात स्वागत करून त्यांना दुसऱ्यांदा पश्चिम नागपुर आमदार म्हणून निवडूण देणार असा जयघोष केला. यावेळी विकास ठाकरे म्हणाले की, मतदारसंघातील युवकांना सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी आणि त्यांची प्रगती व्हावी म्हणून मतदारसंघात लवकरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारले जाणार आहे. मी दिलेल्या वचननाम्यात प्रभागनिहाय ई-लायब्रेरी तयार करण्यात येणार. तरुणांच्या हाताला काम मिळावे आणि बेरोजगारीचे प्रमाण कमी व्हावे म्हणून व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून कौशल्य विकसित केली जाणार आहेत. रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधांसाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. आगामी काळातही भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तो कदापिही कमी पडू देणार नाही असेही ठाकरे म्हणाले. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पश्चिम नागपुरचा आमदार म्हणून विकास काम करतांना मी केवळ आणि केवळ विकासाला प्राधान्य दिले. माझी काम करण्याची शैली ही भविष्यातील आपला मतदारसंघ हा राज्यात एक नवी ओळख निर्माण करण्याचा राहणार आहे. पश्चिम नागपुरच्या प्रत्येक प्रभागातील मूलभूत प्रश्नांचा अभ्यास करून विकासाभिमूख कामे करण्यात आली. त्यामुळे पश्चिम नागपुरातील जनसमस्यांना यापुढेही सोडविण्याचा आपला निर्धार आहे. त्यामुळे माझ्या पाठिशी आज प्रत्येक मतदार खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास असल्याचेही ठाकरे म्हणाले. मायबाप जनतेचा मला आशिर्वाद त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी दिवस-रात्र काम केल्यामुळे मिळत आहे. त्यांनाही असाच लोकप्रतिनिधी हवाय म्हणून जनता आज माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा विकास ठाकरेंना विधानसभेत पाठविण्याचा निर्धार जनतेने घेतला आहे, हे जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून दिसून येत असल्याचेही विकास ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र यादव महासभेचे विकास ठाकरेंना समर्थन
महाविकास आघाडीचे पश्चिम नागपुर विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांना महाराष्ट्र यादव महासभेने समर्थन जाहीर केले. संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सतिश यादव यांनी दिलेल्या समर्थन पत्रात त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र यादव महासभेच्या (रजि.) आयोजित बैठकीत सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ठराव मंजूर केला. यात आगामी निवडणुकीत हिंदी भाषिक मतदारांच्या हितार्थ नागपूर जिल्ह्यातील सर्व 12 विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र यादव महासभेने घेतला आहे. यादव समाज बंधू कडून मतदान करण्याचे आवाहनही सतिश यादव यांनी केले आहे.
शारदा चौकात जन-आशीर्वाद यात्रेचे जंगी स्वागत
महाविकास आघाडीचे पश्चिम नागपुरचे लोकप्रिय उमेदवार विकास ठाकरेंच्या जन-आशीर्वाद यात्रेला गुरुवारी कुंभार टोली परिसरातून करण्यात आली. सकाळी आठ वाजता परिसरातील प्रमुख देवस्थाळांचे पूजन करून प्रारंभ झालेल्या जन-आशीर्वाद यात्रा पुढे पाटील रोड, नेताजी मार्केटच्या मागील भाग, छोटी धंतोली, यशवंत स्टेडियम, छोटा संगम, झाशी राणी चौक, बडा संगम, हनुमान गल्ली, कोष्टीपूरा, माळीपूरा, आनंदनगर, तेलीपूरा, बुरड गल्ली, इलेक्ट्रॉनिक मार्केट, तेलीपूरा, विठ्ठल रुक्मिणी मंदीर, सीताबर्डी टेकडी रोड, मुंडा देवल, टेम्पल बाजार रोड, सिताबर्डी मेन रोड मार्गाने शारदा चौकात यात्रेचे समापन करण्यात आले. तर सायंकाळी पाचच्या दरम्यान जन-आशीर्वाद यात्रेच्या दुसरा टप्प्याची सुरुवात हजारी पहाड चौकातून करण्यात आली. यावेळी नागरिकांनी स्वंयफूर्तीने यात्रेचे जागोजागी जल्लोषात स्वागत करुन विकास ठाकरेंना विजयाचा आशिर्वाद दिला. जन-आशीर्वाद यात्रेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसादातून ठाकरेंचा दुसऱ्यांदा विधानसभेत पाठविण्याचा संकल्प केल्याचे गुरुवारी दिसून आले. जन आशिर्वाद यात्रेत विकास ठाकरे यांनी जाहिर केलेल्या वचननामाचे वाटप नागरिकांना करण्यात आले. भव्य असलेली रैली पुढे शारदा माता चौक, आशा बालवाडी, जुनी वस्ती, शिव मंदीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मनपा दवाखाना, मनोहर विहार, गायत्री कॉलोनी मार्गाने चिंतामणी नगर येथे यात्रेचा समारोप करण्यात आले. जन-आशीर्वाद यात्रेत महाविकास आघाडीमधील सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.