सुभाषनगर मनपा शाळेच्या मतदान केंद्रात विकास ठाकरेंचे सहपत्निक मतदान
राज्याला प्रगतीपथावर नेणाऱ्या लोकसेवेची पंचसूत्री योजना राबविण्याचा सकल्प आज महाविकास आघाडीने जनतेला केला आहे. सशक्त महाराष्ट्राला पुढे नेणाऱ्या महाविकास आघाडीचा अजेंडा सत्तेत पाठवित आहे. शांतता, सौहार्द आदि प्रश्नांना जागरूक नागरिकांनी हाताशी घेत आपला हक्क बजाविला. नागपुर जिल्ह्यासह पश्चिम नागपुरात विधानसभेच्या निवडणुकीत मतदान केंद्रावर मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग आज पाहायला मिळाला. त्यामुळे पश्चिम नागपुर’च्या मतदारांच्या उत्साहातून आपला दुसरा विजय निश्चित असल्याचा विश्वास महाविकास आघाडीचे काँग्रेसचे पश्चिम नागपुरचे उमेदवार व विद्यमान आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केले. बुधवारी सकाळी विकास ठाकरे यांनी परिवारासह सुभाषनगर येथील नागपूर महानगर पालिकेच्या प्राथमिक शाळेच्या बुथ क्रमांक -77 च्या खोली क्रमांक -1 येथे मतदान केले.
पुढे बोलताना विकास ठाकरे म्हणाले की, पश्चिम नागपुरचा प्रत्येक जागरूक मतदाराला गेल्या 5 वर्षांच्या विकास कामांची जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या हात या चिन्हाला पसंती दिल्याचे आज दिसून आले. पश्चिम विधानसभा क्षेत्रात जनतेने स्वत: हून बाहेर पडून मतदानाचा हक्क बजाविला. यात जेष्ठांसह तरुणांचा सहभाग हा उत्सर्फूत दिसून आला. सर्व मतदारांनी लोकशाहीच्या पवित्र पर्वात सहभागी झाल्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. तसेच या निवडणूकीत तनमन धनाने माझ्यासोबत दिवस रात्र प्रचारात महाविकास आघाडी असलेल्या सर्व पक्षातील पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतले त्यांचे मी मनापासून आभार मानत असल्याचेही विकास ठाकरे यांनी सांगितले.