By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
policetimesnews.compolicetimesnews.compolicetimesnews.com
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • गुन्हे
  • क्रीडा
  • व्यापार व उद्योग
Search

Archives

  • February 2025
  • January 2025
  • December 2024
  • November 2024
  • October 2024

Categories

  • क्रीडा
  • गुन्हे
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • व्यापार व उद्योग
  • Advertise
© 2024 Police Times News. All Rights Reserved.
Reading: Wisdom of Saints : भावी पिढीमध्ये रुजवावे संतांचे विचार
Share
Notification Show More
Font ResizerAa
policetimesnews.compolicetimesnews.com
Font ResizerAa
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • गुन्हे
  • क्रीडा
  • व्यापार व उद्योग
Search
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • गुन्हे
  • क्रीडा
  • व्यापार व उद्योग
Follow US
  • Advertise
© 2024 Police Times News. All Rights Reserved.
policetimesnews.com > ताज्या बातम्या > Wisdom of Saints : भावी पिढीमध्ये रुजवावे संतांचे विचार
ताज्या बातम्या

Wisdom of Saints : भावी पिढीमध्ये रुजवावे संतांचे विचार

"Inspiring the Future: Nitin Gadkari on Embedding Saints' Teachings" "Building a Brighter Future Through the Wisdom of Saints"

Police Times News Admin
Last updated: 06/01/2025 4:36 PM
Police Times News Admin
Share
3 Min Read
Wisdom of Saints
Wisdom of Saints
SHARE

भावी पिढीमध्ये रुजवावे संतांचे विचार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; विश्व वारकरी सेवा संस्थेतर्फे अभिनंदन सोहळा

नागपूर – महाराष्ट्राची संस्कृती संतांच्या वाङ्मयाशी जुळलेली आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, गजानन महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आदी संतांनी जीवन कसे जगावे, याचा संदेश दिला. सुसंस्कृत समाज निर्माण होण्यासाठी संतांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. त्यासाठी भविष्यातील पिढीमध्ये संतांचे विचार रुजविण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे. त्यातून समाज उभा होईल आणि राष्ट्रनिर्माणाचे उद्दिष्ट साध्य होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार, दि. ३ जानेवारी) केले.

Contents
भावी पिढीमध्ये रुजवावे संतांचे विचारकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी; विश्व वारकरी सेवा संस्थेतर्फे अभिनंदन सोहळाआपले आशीर्वाद होते म्हणून…
Wisdom of Saints
Wisdom of Saints

विश्व वारकरी सेवा संस्थेच्या वतीने जुना सुभेदार ले-आऊट येथील आदर्श मंगल कार्यालयात अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ना. श्री. गडकरी बोलत होते. यावेळी विश्व वारकरी सेवा संस्थेचे संदीप काळे यांची उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘महासागरातील प्रत्येक थेंब महत्त्वाचा असतो. तसेच अंधःकार नाहीसा करण्यासाठी एक छोटासा दीप महत्त्वाचा असतो. सूर्याचा आणि  चंद्राचा अस्त होईल, तारे लोप पावतील. सगळीकडे अंधःकार होईल.  अशावेळी दीप म्हणतो की, मी जळत राहील. किती उजेड देऊ शकेन, हे माहिती नाही; पण अंधःकार दूर करण्याचा माझा प्रयत्न अखेरपर्यंत सुरू राहील.’

संतांचे विचार, त्यांनी दिलेले संस्कार भक्तीमार्गाच्या माध्यमातून भविष्याच्या पिढीपर्यंत पोहोचावेत, असा उद्देश आहे. सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी संतांचा प्रत्येक विचार अंधःकार नाहीसा करणाऱ्या तेजस्वी पणतीप्रमाणे आहे, असेही ते म्हणाले.

‘जे का रंजलें गांजले, त्यासी म्हणे जो आपुले… तोचि साधु ओळखावा, देव तेथेंचि जाणावा’. माझी आई मला नेहमी संत तुकाराम महाराजांचा हा अभंग सांगायची. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे : ‘आकाशात् पतितं तोयं, यथा गच्छति सागरम् । सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ||’. ‘पडे खालती जे नभातून पाणी… जसे सागरा तेच जाते मिळोनी; नमस्कार कोणाही देवास केला… तरीं अंती तो पोचतो केशवाला’ असा या संस्कृत सुभाषिताचा मराठी अनुवाद आहे. स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या भाषणात हेच सांगितले आहे. ‘माझा धर्म किंवा परमेश्वर श्रेष्ठ आहे, हे सांगायला मी इथे आलेलो नाही. कारण तुमची ज्या धर्मावर, परमेश्वरावर श्रद्धा असेल, त्याची भक्ती करून शेवटी आपण एकाच ठिकाणावर पोहोचणार आहोत,’ असा विचार स्वामी विवेकानंदांनी मांडला, या शब्दांत ना. श्री. गडकरी यांनी संतांच्या विचारांचे महत्त्व विशद केले.

भक्तीरसाचा संस्कार समाजात निर्माण झाला तर समाजात गुणात्मक बदल होईल. आपण चांगल्या विचारांच्या सहवासात असलो तर चांगली प्रेरणा मिळते. संत गोरा कुंभार, चोखामेळा, गजानन महाराज, तुकडोजी महाराजांची आपण जात विचारत नाही. कारण माणूस त्याच्या जातीने नव्हे तर गुणांनी श्रेष्ठ असतो. त्यामुळे जे चांगले आहे ते स्वीकारण्याची भूमिका असली पाहिजे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.

Wisdom of Saints
Wisdom of Saints

आपले आशीर्वाद होते म्हणून…

आपण आशीर्वाद दिले त्यामुळे मी निवडणुकीत विजयी झालो. दहा वर्षांत एक लाख कोटी रुपयांची कामे मी नागपुरात करू शकलो. आतापर्यंत मला दहा डॉक्टरेट मिळाल्या. कालच आणखी एका विद्यापीठाचीही डी.लिट. मिळाली. हे सारे आपण दिलेल्या पाठबळामुळेच शक्य होऊ शकले, या शब्दांत ना. श्री. गडकरी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

You Might Also Like

IIFA 2025 की भव्य सिल्वर जुबली में शिरकत करेंगे Nandamuri Balakrishna

Nagpur Hosts 5-Day HRD Program on Integrated Pest Management

Becoming India’s Gadchiroli Steel Hub: Nitin Gadkari | ₹5 Lakh Crore Investment for Vidarbha

India Clinches Thrilling Victory in 1st ODI 2025 Against England at Nagpur

Dr. Shriram Kandhare Honored for His Research on Nitin Gadkari

TAGGED:bhakti movementcultural renaissancecultured societyembedding saints' teachingsindian philosophylife lessons from saintsmoral values for future generationsnation-building through cultureNitin Gadkari Speechsaint thoughts for societysant gyaneshwar teachingssant tukaram teachingsspiritual inspirationspiritual valuesswami vivekananda thoughts

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
News Letter Sign up
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Share
Previous Article waste materials in construction वेस्ट मटेरियलच्या वापरातून पर्यावरण रक्षणाचे उद्दिष्ट :waste materials in construction
Next Article Trust in cooperative Institutions Trust in cooperative Institutions : विश्वासार्हता हेच सहकारी संस्थांचे भांडवल
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
- Advertisement -

Latest News

MP Bhajan Competition 2025
GuruMauli Bhajan Mandal Wins MP Bhajan Competition 2025!
ताज्या बातम्या देश 05/02/2025
kanchanatai gadkari
Kanchanatai Gadkari Leads Charitable Hospitals: A New Era Begins!
ताज्या बातम्या 05/02/2025
Mahakumbh 2025
Mahakumbh 2025 : Where Spirituality Meets Emotional Healing
ताज्या बातम्या 01/02/2025
credit to Instagram
Salman Khan Shares Life Lessons with Nephew Arhaan, Says “You Will Hate Me…”
ताज्या बातम्या 01/02/2025

Recent Posts

  • IIFA 2025 की भव्य सिल्वर जुबली में शिरकत करेंगे Nandamuri Balakrishna
  • Nagpur Hosts 5-Day HRD Program on Integrated Pest Management
  • Becoming India’s Gadchiroli Steel Hub: Nitin Gadkari | ₹5 Lakh Crore Investment for Vidarbha
  • India Clinches Thrilling Victory in 1st ODI 2025 Against England at Nagpur
  • Dr. Shriram Kandhare Honored for His Research on Nitin Gadkari

Recent Comments

  1. Nagpur Hosts 5-Day HRD Program on Integrated Pest Management - policetimesnews.com on Becoming India’s Gadchiroli Steel Hub: Nitin Gadkari | ₹5 Lakh Crore Investment for Vidarbha
  2. Becoming India’s Gadchiroli Steel Hub: Nitin Gadkari | ₹5 Lakh Crore Investment for Vidarbha - policetimesnews.com on India Clinches Thrilling Victory in 1st ODI 2025 Against England at Nagpur
  3. India Clinches Thrilling Victory in 1st ODI 2025 Against England at Nagpur - policetimesnews.com on Dr. Shriram Kandhare Honored for His Research on Nitin Gadkari
  4. Dr. Shriram Kandhare Honored for His Research on Nitin Gadkari - policetimesnews.com on GuruMauli Bhajan Mandal Wins MP Bhajan Competition 2025!
  5. Kanchanatai Gadkari Leads Charitable Hospitals: A New Era Begins! - policetimesnews.com on Mahakumbh 2025 : Where Spirituality Meets Emotional Healing

You Might also Like

Budget 2025 Highlights
ताज्या बातम्यादेश

Budget 2025 Highlights : टैक्स में बड़ी राहत, 12 लाख तक इनकम टैक्स फ्री!

01/02/2025
Shahrukh Mulani
ताज्या बातम्यादेशमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील सर्व कार्यालयांमध्ये राष्ट्रगीताने कामकाजाची सुरुवात करा – Shahrukh Mulani

30/01/2025
ममता कुलकर्णी
ताज्या बातम्या

महाकुंभ 2025: महामंडलेश्वर बनीं ममता कुलकर्णी, बाबा रामदेव ने जताई आपत्ति

29/01/2025
Stage Collapse Tragedy
ताज्या बातम्या

Shocking Stage Collapse Tragedy at Baghpat Festival: 7 Dead, 40 Injured

28/01/2025
Previous Next
//

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet

Quick Link

  • MY BOOKMARK
  • INTERESTSNew
  • CONTACT US
  • BLOG INDEX

Top Categories

  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • गुन्हे
  • क्रीडा
  • व्यापार व उद्योग

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

News Letter Sign up
policetimesnews.compolicetimesnews.com
Follow US
© 2024 Police Times News. All Rights Reserved.
  • Advertise
Police Times News Police Times News
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?