नागपूर : जुन्या पिढीतील अर्थशास्त्रज्ञ डॉ. श्री. आ. देशपांडे यांचे विविध विषयांवरील लेख तसेच त्यांच्या स्मृतिलेखांवर आधारित “स्मृतींचा `अर्थ`वेध“ या ग्रंथाचा विमोचन सोहळा रविवारी दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता उत्तर अंबाझरी मार्गावरील हरदास सभागृह, आयएमए अनेक्स येथे आयोजिण्यात आलेला आहे.
नागपुरातील ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ स्व. डॉ. श्री आ देशपांडे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. निमित्त्याने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याच्या उद्देशाने “स्मृतींचा `अर्थ`वेध“ या ग्रंथाची निर्मिती करण्यात आलेली आहे. सोहळ्याच्या अध्यक्षपदी दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चचे प्र- कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा राहणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक हितवादचे प्रमुख संपादक विजय फणशीकर तर विशेष अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे आणि दिल्लीचे व्यवस्थापन सल्लागार डॉ. राजशेखर द्रवीड उपस्थित राहणार आहेत. मंचावर जी एच रायसोनी विद्यापीठ, अमरावतीचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे तसेच प्रख्यात शल्यतज्ञ डॉ. यशवंत देशपांडे उपस्थित राहतील. यावेळी “स्मृतींचा `अर्थ`वेध“ या ग्रंथावर डॉ. विनायक देशपांडे भाष्य करणार असून ग्रंथातील लेखक- लेखिकांना यावेळी देशपांडे परिवाराच्या वतीने सन्मानित केलया जाणार आहे. कार्यक्रमात डॉ. श्री. आ. देशपांडे यांच्या जीवनकार्यावर आधारित `अर्थतपस्वी : डॉ. श्री. आ. देशपांडे` ही ध्वनीचित्रफीत दाखविली जाणार आहे.
रविवारी “स्मृतींचा `अर्थ`वेध“ ग्रंथाचे प्रकाशन
अर्थशास्त्रज्ञ डॉ. श्री. आ. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा कार्यक्रम
Leave a comment